Saturday, 7 November 2015

यशवंत सेना

                 ।। यशवंत सेना ।।
प्रति,
श्री._ _ _
सन्माननीय जमात बांधव,
              आपणास मानाचा जय मल्हार,
            आपण आपला संपर्क क्रमांक आम्हाला "यशवंत सेना,महाराष्ट्र राज्य"च्या ऑफिशल अकाउंट वर एक यशवंत सैनिक म्हणून दिला होता,यशवंत सेना पुन्हा सुरु व्हावी आणि "कै.बापूसाहेब कोकरे" यांचा 90 च्या दशकातला झंझावात पुन्हा या महाराष्ट्रात उभा रहावा,अशी अनेक युवकांची इच्छा आहे.
             धनगर समाजाच्या अनेक समस्या आजही सुटत नाहीत....मेंढपाळावर होणारे अत्याचार व सामाजिक अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज पुन्हा एकदा "यशवंत सेनेची" गरज भासत आहे.
             युवकांनो, "आपल्या हक्काचे व न्यायाचे एकमेव व्यासपीठ म्हणजे यशवंत सेना."अशी संघटनेची महाराष्ट्रास ओळख आहे.धनगर आरक्षणाचे जनक मा.कै.बापूसाहेब कोकरे{B.K} व यशवंत सेनेचा ढाण्या वाघ "कै.अरुणकुमार वाघे" यांनी क्रांतिची मशाल महाराष्ट्रभर वाडया,वस्त्या वरुन शहरात पेटवली होती.आज जे आपण  NT(C) ची सवलत उपभोगत आहे,ते केवळ यांच्या निस्वार्थ कार्यामुळेच साध्य होऊ शकले.
              आज परिस्थिती बदलली आहे,आज किमान आपण "सोशल मिडियाच्या" माध्यमातून एकमेकांशी संवाद साधू शकतो,त्यावेळेस अशा सुविधा उपलब्ध नव्हत्या.तरी,त्यांनी कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता त्यांनी त्यांचे आपेक्षित कार्य करून दाखवले.आपण तर 21व्या शतकातील तरुण आहोत,आपणास चांगल्या वाईटाची जाण,चातुर्य बुद्धि व बल असून आजचा युवक निष्फळ वाया घालवत आहे.
              अरे,युवकांनो पेटून उठा आपल्याला आपल्या स्वतःचा न्याय व हक्कासाठी स्वतःलाच लढाव लागेल,पण हे करत असताना योग्य दिशादर्शकाची गरज असते.ते दिशादर्शक म्हणजे मा.कै.बापूसाहेब कोकरे व मा.कै.अरुणकुमार वाघे होय.आज त्यांच्याच विचारधारेवर आपणाला वाटचाल करावीच लागेल.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा बापूसाहेबांचे व वाघेसाहेबांचे खंदे समर्थक व निष्ठांवंत सहकारी यशवंत सेनेची पुनरबांधणी करत आहेत.तरुणांनो सज्ज् व्हा,पुन्हा एकदा  महाराष्ट्रात यशवंत सेनेचे पिवळे वादळ निर्माण करुयात,चला यशवंत सेनेत सामिल होवूयात,सामजिक प्रगती करूयात.
त्यासाठी प्रत्येक युवकाने "कट्टर यशवंत सैनिक" म्हणून उभे राहिले पाहिजे .

"आपण आपल्या जमातीचे काहीतरी देणे लागतो म्हणून निस्वार्थपणे झटण्याची तयारी ठेवा"
         
।।जय अहिल्या।।
।। जय यशवंत।।

------------------------------------
                    आपले विनीत,
            यशवंत सेना,महाराष्ट्र राज्य.

No comments:

Post a Comment